यवतमाळात एमडी ड्रग्जसह चौघांना अटक; ५.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 20, 2026

यवतमाळात एमडी ड्रग्जसह चौघांना अटक; ५.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळात एमडी ड्रग्जसह चौघांना अटक; ५.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त



यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्या चार इसमांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून ५ लाख ३९ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २० मे २०२६ रोजी करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिंद्रा कंपनीची के.यू.व्ही. 100 (एम.एच. 14 जी.डी. 1597) या वाहनावर लक्ष ठेवले. यवतमाळकडे येणाऱ्या या वाहनाला भाम टोलनाक्याजवळ अडवून तपासणी करण्यात आली. वाहनातील एका पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. चौकशीदरम्यान ती एमडी (Mephedrone) अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.



पोलिसांनी शाहजाद खान शमी खान (रा. इंदिरा नगर, यवतमाळ), शेख शाहरुख शेख मेहबूब (रा. अकोला), साजिद उर्फ हत्ती सलीम सय्यानी (रा. यवतमाळ) आणि अल्तमश खान अमजद खान पठाण (रा. वसंतनगर, यवतमाळ) यांना ताब्यात घेतले.

या कारवाईत १५.०७ मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज, रोख रक्कम, चार मोबाईल फोन आणि संबंधित वाहन असा एकूण ५.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आरोपी शाहजाद खान याच्यावर यापूर्वीही एमपीडीए कायद्यान्वये कारवाई झाली होती, तर साजिद सय्यानी व त्याच्या टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu