दिग्रस: 'दागिने पॉलिश'च्या बहाण्याने वृद्धेची फसवणूक - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Tuesday, May 5, 2026

दिग्रस: 'दागिने पॉलिश'च्या बहाण्याने वृद्धेची फसवणूक

 दिग्रस: 'दागिने पॉलिश'च्या बहाण्याने वृद्धेची फसवणूक



लोक विधान/दिग्रस: दिग्रस पोलीस ठाण्यांतर्गत तपा टाकळी येथे एका वृद्ध महिलेला दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखवून तीन अज्ञातांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी सौ. सायराबाई मधुकर राठोड (वय ६० वर्षे) या ३ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या घरी असताना तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करून ते नव्यासारखे करून देण्याची बतावणी केली. सायराबाईंनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या दोन तोड्याच्या चांदीच्या पाटल्या पॉलिश करण्यासाठी त्यांच्या स्वाधीन केल्या. मात्र, आरोपींनी हातचलाखी करून त्या चांदीच्या पाटल्या चोरून नेल्या आणि तिथून पसार झाले. या चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १८,००० रुपये असून सायराबाईंनी दिलेल्या फिर्यादीवरून दिग्रस पोलिसांनी कलम ३०३(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu